वीज जोडणी नसतांना चर्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला 90 हजारांचे बिल
बीड, (रिपोर्टर)ः- वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार नेहमीच चव्हाट्यावर येत आहे. बीड तालुक्यातील चर्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राची वीज जोडणी नसतांनाही वीज वितरण कंपनीने या केंद्राला 90 हजार रूपयांचे बिल दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जावू लागले आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधिकार्यांनी लेखी कळवूनही वीज वितरण कंपनी मात्र बिल देत आली आहे.
चर्हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला विजेची जोडणी नसतांना विजे अभावी शस्त्रक्रिया, अंतररूग्ण विभाग या सुविधा मिळत नसल्याने रूग्णांची खेळसांड होत आहे. वीजे अभावी रूग्णांची खेळसांड थांबावी म्हणून विज जोडणीसाठी निधी मिळावा यासाठी डॉ.गणेश ढवळे आणि त्यांच्या सहकार्यांनी निवेदन व आंदोलनाच्या माध्यमातून 10 लक्ष रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करून घेतला असतांना एकीकडे त्याचे अद्याप काम सुरू नसतांना वीज जोडणी नसतांना महावितरणचे तब्बल 90 हजार रूपये वीज बिल आले असून संबंधित प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.मदन काकड यांनी सहाय्यक अभियंता नवगण राजुरी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र चर्हाटा येथे अद्याप विद्युत जोडणी झालेली नसतांना येत असलेल्या वीज बिल बाबतीत शहानिशा करून विज बील येणार नाही याची दक्षता घ्यावी असे लेखीपत्रा द्वारे कळवून ही दररमहिन्याला वीज बिल येत असून हा आकडा 90 हजारावर पोहंचला आहे. या प्रकाराने संताप व्यक्त केला जात असून वीज वितरण कंपनीचा कशा पध्दतीने कारभार चालतो हे समोर आले आहे.








