अज्ञात वाहत चालकावर गुन्हा दाखल
तलवाडा (रिपोर्टर)-मॉर्निंग वॉक करून घरी परत येत असलेल्या एका वृद्धाला अज्ञात वाहन चालकाने समोरून येऊन जोराची धडक दिली. या धडकेत वृद्धाला जबर मार लागला असून अज्ञात वाहन चालकावर तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 मे रोजी सकाळी पाच वाजता मॉर्निंग वॉक साठी गेलेले असताना मॉर्निंग वॉक करूत घरी परत येताना भेंड खुर्द फाट्याजवळ हॉटेल सह्याद्री जवळ गडी ते माजलगाव कडे जाण्याच्या रोडवर अज्ञात वाहन चालकाने त्यांच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालून भरधाव वेगातून वृद्धाला समोरून जोराची धडक दिली. या धडकेत वृद्धाच्या पायाला हाताला पोटाला गंभीर मार लागून जखमी केले. या प्रकरणात काल दुपारी अडीच वाजता वृद्धाच्या मुलाने तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये येऊन अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला.पुढील तपास तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.








