
पोलिसांनी वाळूसह वाहने केली जप्त
आरोपी विरोधात गुन्हा दाखल
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये वाळूचा ठेका सुरू नसतांनाही चोरून अनेक विविध नद्यातून वाळूचा उपसा केला जात आहे. वाळू घेवून जाणार्या माफिया विरोधात पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदफना नदीच्या पात्रातून धारवंटा शिवारामधून ट्रॅक्टरद्वारे वाळू नेली जात असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून ट्रॅक्टर क्र.ंएम.एच.23.बीएच 2031 ताब्यात घेतला. या ट्रॅक्टरच्या पाठीमागे दोन ट्रॉली बसविण्यात आल्या होत्या त्याही पोलिसांनी जप्त केल्या एकूण मुद्देमाल 4 लाख 50 हजारांचा ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी चकलांबा ठाण्याचे प्रशांत घोगडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी वाळूची कारवाई गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पांढर्या रंगाच्या लिलॅड मालवाहू टॅम्पो क्र.एम.एच.23 एयू.6924 याच्यामध्ये एक ब्रास वाळू आढळून आली. वाळूसह टॅम्पो पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी रामेश्वर काकडे यांच्या फिर्यादीवरून युवराज चिकणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी वाळूची कारवाई माजलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू घेवून जात असतांना ट्रॅक्टर मालकास पकडण्यात आले. या प्रकरणी शहर ठाण्याचे कॉ.अमोल कदम यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक अश्फाक बेग अहेमद बेग (रा.गांधनपुरा माजलगाव), संजय पांडूरंग अडागळे (रा.घापरवाडी ता.वडवणी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








