
बसस्थानकात प्रवासी असुरक्षित
केज (रिपोर्टर)- केज बस स्थानकात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एका महिलेचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचा घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केज बस स्थानकात चोरट्यांनी महिला बस मध्ये चढत असताना महिलेचे मिनी गंठण चोरले याबाबत महिलेने केज पोलीस स्टेशनला जाऊन अज्ञात चोरट्याने विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुनिता बाबुराव लासे व 49 व्यवसाय नोकरी राहणार छत्रपती संभाजीनगर या 14 जून रोजी दुपारी साडेचार वाजता केज ते कळंब मध्ये जाणार्या बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे ज्याची किंमत 68 हजार रुपये किमतीचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला. महिलेच्या लक्षात आल्यावर महिलेने केज पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केज पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.








