
चकलांबा पोलिसांची कारवाई
चकलांबा-पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले असून चकलांबा पोलिसांनी मागच्या काही दिवसांपासून कारवाईची मोहीम जोरदार राबविण्यास सुरुवात केली आहे.जुगार अड्डे,वाळूचे टॅक्टर,हायवा ताब्यात घेण्याची कारवाई केल्यानंतर आता एका कारमधून गुटख्याचे पोते पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.यात 4 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की एका कारमधून गुटख्याची वाहतूक होणार आहे.त्यानुसार नगर -बीड यांच्या सीमेवर असणार्या गोगस पारगाव येथे सापळा रचून अंधारात वाट बघत बसलो संशयित वाहन येताच तात्काळ रस्त्यावर बॅरिगेट्स आडवे लावून सदरचे वाहन अडविले व त्याची तपासणी केली असता कार क्रं. चक 12 टथ 2162 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याचे चार मोठे पोते आढळून आले आहेत.
याप्रकरणी गाडी चालक शिवाजी मारोती बटूळे वय 43 रा. भरजवाडी ता. पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत 4 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,पोलीस उपअधीक्षक श्री.राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, किरण मिसाळ, प्रशांत घोंगडे, खटाणे, अर्जुन थापडे आदींनी केली आहे.





