
बीड ग्रामीण पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला
बीड (रिपोर्टर): वाळुची लपून-छुपून वाहतूक सुरुच आहे. नामलगाव फाट्याच्या परिसरामध्ये एका माल वाहतूक गाडीतून वाळू जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी सदरील ट्रक ताब्यात घेऊन संबंधिताविरोधात कारवाई केली आहे.
नामलगाव फाटा येथे ट्रक क्र. एम.एच. 18 बी.झेड. 2371 या मालवाहू गाडीतून वाळू जात असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी सदरील ट्रक ताब्यात घेतला असता चालकाकडे रॉयल्टीबाबत विचारणा केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत संबंधिताविरोधात कारवाई केली आहे.






