
रुग्णवाहिका चालकांना सन्मानासह न्याय देणे ही शासनाची जबाबदारी
बीड (रिपोर्टर): महाराष्ट्र राज्य 102 वाहन चालक कर्मचारी यांचे पाठीमागील ऑगस्ट 2024 पासून ते आजपर्यंत जवळपास साडेनऊ ते दहा महिन्यांचे वेतन थकले. यामुळे ते वेतन मिळवण्यासाठी आज 102 वाहन चालक कर्मचारी संघटना यांनी काम बंद करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला.
बीड जिल्ह्यातील व इतर तालुक्यातील 102 आपत्कालीन रुग्णवाहक सेवा चालकांना मागील 10 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे अनेक चालक व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या आर्थिक संकटाला कंटाळून 30 जून 2025 पासून बीड जिल्ह्यात व तालुक्यात काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. पण आषाढी एकादशीनिमित्त रुग्णांची हेळसांड होऊ नये. म्हणून या संघटनेने त्याच दिवशी हा संप मागे घेतला होता.6 जुलै पर्यंत वेतन अदा करण्याची मागणी करून सुद्धा आजपर्यंत या कर्मचार्यांचे वेतन मिळालेले नाही. यासंबंधी शासनाने विचार करून संबंधित कंत्राटदारास व चालकांचे थकीत मासिक पगार देण्यास हे मानधन निविदेप्रमाणे प्रति वाहन चालकास दरमहा 25 हजार 159 रुपये एवढे देण्यात यावे. यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचार्यांनी उपोषण केले. व त्या उपोषणाला क्षीरसागर हरिओम सुधीरराव जिल्हाध्यक्ष युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.





