काल दुपारपर्यंत अनेक विभागाचे कुलूपच उघडले नव्हते
बीड, (रिपोर्टर)ः- बीड पंचायत समितीच्या विविध कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे नुतन सीईओ जितीन रहेमान हे येणार असल्याने कर्मचारी सकाळी वेळेच्या आधी कार्यालयात हजर होते. त्याच बरोबर कार्यालयाचा परिसरही चकाचक दिसून येत होता. काल मात्र दुपारपर्यंत अनेक विभागाचे कुलूप उघडले नव्हते. सीईओ आज येणार असल्याने कर्मचारी वेळेवर हजर राहिले. दररोज असे वेळेवर हजर का राहत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीईओ यांनी गैरहजर राहणार्या कर्मचार्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
जिल्हा परिषदेचे नुतन सीईओ जितिन रहेमान यांनी काही दिवसापुर्वी पंचायत समितीला अचानकपणे भेट देवून कामाचा आढावा घेतला होता. तसेच कामचुकार कर्मचार्या विरोधात कारवाईचा इशाराही दिला होता. आज पुन्हा सीईओ येणार असल्याने कर्मचारी सकाळीच वेळेच्या आधी कार्यालयात हजर होते. कार्यालय परिसर अगदी चकाचक करण्यात आला होता. काल मात्र दुपारपर्यंत कार्यालयातील काही विभागाचे कुलूप उघडले नव्हते. कर्मचारी आपल्या कामात हलगर्जीपणा करतच आहेत. आज सीईओ येणार म्हणून सगळे हजर आहेत. उद्यापासून पुन्हा कर्मचार्याची अशीच हजेरी दिसेला का असा प्रश्न उपस्थित होत आहे.








