
महोम्मदीया कॉलनीत रस्ते नाल्या नाहीत
नालीचे दुर्गंधयुक्त पाणी नागरीकांच्या घरात
बीड(रिपोर्टर)ः- शहरातील महोम्मदीया कॉलनी प्रभाग क्र,21 या ठिकाणी रस्ते नाल्या नसल्याने येथील नागरीकांना अनेक नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात तर रस्त्यावरुन पायी चालणे मुश्कील होते. सदरील भागात रस्ते नाल्या कराव्यात अशी मागणी गेल्या सहा वर्षापासून येथील नागरीक नगर पालिकेकडे करत आहे. मात्र नगर पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. नाल्या नसल्याने दुर्गंधयुक्त पाणी नागरीकांच्या घरात जात आहे.
शहरामधील प्रभाग क्र.21 महोम्मदीया कॉलनी भागात रस्ते नाल्या नसल्यामुळे तेथील नागरीकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे नालीचे पाणी नागरीकांच्या घरात जात आहे. त्यामुळे विविध आजाराची लागण होत आहे. याठिकाणी राहावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. न.प. कडे गेल्या सहा वर्षापासून शेख रहीम मैनोद्दीन हे पाठपुरावा करत आहे. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हाधिकारी यांनी शहरातील नागरी समस्या जाणुन घेवून नगर पालिका प्रशासनाला योग्य त्या सुचना दयाव्यात.
आजी-भावी नगर सेवक नुसतेच मिरवायला आहेत का?
महोम्मदीया कॉलनी भागात नागरीकांना किती त्रासाला सामोरे जावे लागते हे माजी नगर सेवक व भावी नगरसेवकांना दिसत नाहीत का? निवडणुकीच्या वेळी नुसताच जनतेचा पुळका दाखविला जातो एैरवी मात्र लोकांना विचारले जात नाही किंवा त्यांच्या समस्या जाणून घेतले जात नाही, त्यामुळे प्रभाग क्र.21 मधील माजी आणि भावी नगरसेवका विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.








