पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल
काझी नगरमध्ये घडली होती घटना
बीड, (रिपोर्टर)ः- शहरातील काझी नगरमध्ये राहणार्या एका 75 वर्षीय वयोवृध्दाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.या आत्महत्या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उस्मान कादर शेख (वय 75 रा.काझीनगर) यांनी आपल्या राहत्या घरी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सदरील ही घटना 19 जून 2025 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यानुसार फिर्यादी शबाना बेगम उस्मान शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी इरफान उस्मान शेख, इम्रान उस्मान शेख, हफीक मुकरोद्दीन शेख, अहमद हफीज शेख, नबीद हफीज शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.









