मंडल अधिकारी व तलाठी नियुक्त गावात हजर राहत नसल्याने शेतकर्यांची मोठी कोंडी
पात्रुड, (रिपोर्टर)ः- माजलगाव तालुक्यातील महसूल विभागातील मंडल अधिकारी व तलाठी नियुक्त गावात हजर राहत नसल्याने शेतकर्यांची मोठी कोंडी होत आहे. शेतकर्यांना आपली कामे सोडून तलाठी कार्यालया समोर त्यांच्या येण्याची वाट पाहत दिवस काढावा लागत आहे.तरी ही ते न येता दांडी मारत असल्याने या दांडी बहाद्दर कर्मचार्यामुळे शेतकर्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. याकडे तहसीलदार,व जिल्हाधिकारी यासह वरिष्ठ लक्ष देणार का? असा संतप्त सवाल माजलगाव तालुक्यातील शेतकर्यांमधून विचारला जात आहे. सध्या बहुतांश कर्मचारी नियुक्त ठिकाणी न येता बसूनच आपले कामकाज करत आहेत. यामध्ये महसूल खात्याचे कर्मचारी वर्गाचा सर्वात वरती नंबर आहे.गावात शासनाकडून तलाठी व सर्कल यांना नियुक्त गावे देण्यात आली आहेत. त्यांना त्यांची बसण्याची ठिकाणेही दिलेली आहेत. परंतु या सर्व गावात एकाही ठिकाणी शासनाने नेमून दिलेल्या वेळेत दररोज तलाठी किंवा सर्कल हजर नसतात.
तलाठी सर्कल यांना शासनाने नियुक्त गावात आपली वेळ ठरवून दिली आहे.त्याप्रमाणे संबंधितांचे वेळापत्रक त्यांच्या नियुक्ती ठिकाणी असणे गरजेचे आहे. परंतु गावात त्यांची कामाची वेळ व कामाचे दर्शनी भागात वेळापत्रक असणे गरजेचे आहे.परंतु असे कोणतीही वेळापत्रक कोणत्याही तलाठी अथवा सर्कल कार्यालयात पहावयास मिळत नाही. त्यामुळे आपल्या कामकाजाला शेतीकामातून वेळ काढून शेतकरी जर महसूल कार्यालयात गेला तर त्या ठिकाणी तलाठी किंवा सर्कल भेटत नाहीत. परिणामी शेतकर्यांना तलाठी यांच्या आगमनाची वाट पाहत बसावे लागते. तरीही तलाठी येत नसल्याने हाताखालचा कर्मचारी ताठरपणाने वागत शेतकर्यांची आडवणूक करून पिळवणूक करत असतो.आर्थिक त्यामुळे शेतकर्याला आपले काम करून घेण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने मागेल तेवढी रक्कम द्यावी लागते.शेतकर्यांना जागेवर व वेळेत सेवा देण्यासाठी ही कार्यालय आहेत. परंतु तालुक्यात मात्र वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांचा वचक प्रशासनावर नसल्याने उलटा कारभार सुरू आहे. शासन शेतकर्याच्या दारी असे शासनाचे ब्रीद आहे. परंतु तालुक्यात मात्र शेतकर्यांनी शासन दारी यावे अशी उलटी गंगा वाहत येण्याचा प्रकार सुरू आहे.
महसूल प्रशासनातील अधिकार्यांनी एखादा दुसरा दिवस तालुका जिल्हास्तरावर कामकाजात घालवला तर गैर नाही








