परळी वैजनाथ, (रिपोर्टर)ः- रस्त्यावरून जात असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचे छेड काढल्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील भीमनगर भागात राहणारी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी भीमनगर भागातील रस्त्यावरून जात असताना त्याच ठिकाणी राहणार्या अविनाश साळवे नामक व्यक्तीने अल्पवयीन मुलीस रस्यामध्ये थांबवुन मला तुला काहीतरी बोलायचे आहे असे म्हणाला व थोडे समोर गेल्या नंतर तिचे उजव्या हाताला पकडुन तीची छेड काढुन तिचे मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले व शिवीगाळ केली.ही घटना शनिवार दि 12 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली असून या प्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुरन 160/2025 कलम 74,352 इछड सह कलम 8,12 पोक्सो कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास ठाण्याचे पोउपनि शिंगणे हे करीत आहेत.








