शेतातून काढला अनधिकृत रस्ता.
बीड, (रिपोर्टर)ः- हसनाबाद येथील गट क्र. 2 व 3 च्या रस्त्याच्या सुनावणी बाबत परळी तहसील कार्यालयातील तहसीलदार शेतातून आपले अधिकाराचा गैरवापर करत अनधिकृत रस्ता काढून देऊ नये. याकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले.
पुष्पा भीमाशंकर जाधव रा. गोवर्धन (हि) ह. मु. हसनाबाद ता. परळी वैद्यनाथ येथील रहिवाशी असून त्यांनी 1जुलै 2025 रोजी मौजे हसनाबाद येथील गट क्र. 2 व 3 च्या रस्त्याच्या सुनावणी बाबत परळी तहसील कार्यालयातील तहसीलदार हे पुष्पा जाधव यांच्या शेतातून अधिकाराचा गैरवापर करत अनधिकृत रस्ता काढून देऊन अन्याय करीत आहेत. त्यांना 13 जुलै 2025 पर्यंत न्याय देण्यात यावा. नाहीतर त्यांनी आमरण उपोषणास बसणार असल्याचे कळविले होते. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.








