
राज्यात आतापर्यंत पावणे बारा लाखच अर्ज
मागील वर्षात 1 कोटी 68 लाख अर्ज आले होते
बीड, (रिपोर्टर )ः-एक रूपयांमध्ये पीकविमा भरण्याची योजना शासनाने यंदा बंद केली. त्यामुळे यावर्षी पीकविमा भरण्याकडे शेतकर्यांचा कानडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. 14 जुलै पर्यंत राज्यातील फक्त पावणे बारा लाख शेतकर्यांनीच अर्ज दाखल केले आहेत. गेल्यावर्षी 1 कोटी 68 लाख अर्ज आले होते. विमा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.
मागील वर्षी एक रूपयांमध्ये पीकविमा भरला जात होता. मात्र या योजनेमध्ये घोटाळा झाल्याने सदरील ही योजना बंद करण्यात आली आहे. यावर्षी खरीप हंगामाचा विमा भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. खरीप हंगामातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मुग उडीद, तुर, मका, भुईमुग, कारळे, तीळ, सुर्यफुल, सोयाबीन या पिकांसाठी दोन टक्के तर कापूस व कांदा पिकांसाठी 5 टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. विमा भरत असतांना शेतकर्यांना यंदा फार्मर आयडीची सक्ती करण्यात आलेली आहे. 31 जुलै पर्यंत विमा भरता येणार असुन 14 जुलै पर्यंत फक्त पावणे बारा लाख शेतकर्यांनीच विम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. गेल्यावर्षी 1 कोटी 68लाख आले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विमा भरण्याची प्रक्रिया संथ गतीने आहे. 31 जुलै पर्यंत 50 लाख शेतकरी तरी विमा भरतात की नाही असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.









