
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत करत आहेत. आपर्यंत अनेक गुंडांनी त्यांनी हर्सुल जेलमध्ये स्थानबद्दल केले आहे. बीड शहरातील एका गुंडास जेलबंद करून त्याची हर्सुल कारागृहामध्ये पाठवून देण्यात आले आहे.
सोहेल खान समत खान (वय 27 रा.जुनी भाजी मंडई) याच्या विरूध्द अनेक गुन्हे आहेत. खुनाचा प्रयत्न, दुखापत, जिवे मारण्याची धमकी देणे यासह अन्य गुन्हे आहेत. सदरील या गुंडाविरोधात एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यास पोलिसांनी पकडून हर्सुलच्या कारागृहामध्ये पाठवले आहे. सदरील ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शितलकुमार बल्लाळ, बाबा राठोड, सचिन अलगड, महादेव दराडे, गणपती राऊत, सिध्देश्वर मुरकुटे, अभिमन्यू अवताडे, अंकुश वरपे, युनूस बागवान, आश्पाक सय्यद, मनोज परजणे, बिभिषण चव्हाण यांनी केली आहे.








