
नशेखोरांना शाळेच्या परिसरात येण्यास प्रतिबंद घाला
बीड, (रिपोर्टर)ः- खंडेश्वरी परिसरातील कंकालेश्वर शाळा परिसरात नशेडीखोरांचा वावर वाढला आहे. शाळा सुटल्यानंतर नशा करणारे लोक या ठिकाणी बसून नशा करत आहेत. या शाळा परिसरास येण्याास सदरील नशाखोरांना पायबंद घालावा व त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरीकांतून केली जात आहे.
खंडेश्वरी परिसरामध्ये कंकालेश्वर विद्यालय आहे. सदरील शाळा सुटल्यानंतर नशा करणारे लोक कंपाऊंडवरून उड्या मारून परिसरामध्ये जातात व त्या ठिकाणी नशा करत बसतात. याचा त्रास आजुबाजुच्या नागरीकांनाही सहन करावा लागत आहे. पेठ बीड पोलिसांनी याची दखल घेवून शाळा परिसरामध्ये नशा करणार्या नशा खोरांची नशा उतरवावी अशी मागणी या भागातील नागरीकांकडून केली जात आहे.








