
आसरडोहच्या नागरिकांचा रास्ता रोको
बीड (रिपोर्टर): आसरडोह-आडस रस्ता कामाला मंजुरी मिळूनही हे काम होत नसल्याने या परिसरातील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. आज संतप्त नागरिकांनी आसरडोह बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
आसरडोह रस्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र रस्त्याचे काम अद्यापही करण्यात आलेले नाही. या परिसरामध्ये मोरफळी, आसरडोह, उमरेवाडी, रोेहीखेड, हिंगणी यासह आदी गावे आहेत. या सर्व गावांना सदरील रस्त्यावरून ये-जा करावी लागते. रस्ता खराब असल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यातच रस्त्यावर खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना मणक्याचे आजार होऊ लागले आहे. रस्त्याचे काम करावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वेळोवेळी केली गेली. मात्र याची अमलबजावणी होत नअसल्याने आज आसरडोह रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आले.या वेळी रविकिरण यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.








