बीड: ऑनलाईन रिपोर्टर
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावर असताना एक दुर्घटना घडली. रुग्णाला भेटण्यासाठी ते ज्या रुग्णालयात गेले त्या रुग्णालयाच्या लिफ्ट ने ते जात असताना लिफ्ट अचानक खाली कोसळली. लिफ्ट चा दरवाजा तोडून जरांगे पाटील व त्यांच्या सोबतचे बाहेर आहे सुदैवाने यात कुणाला मार लागला नाही परंतु काही क्षण काळजाचा ठोका चुकल्याचे अनेकांनी सांगितले
बीडमधील लिफ्ट अपघातात मनोज जरांगे पाटलांसह सहकारी थोडक्यात बचावले. बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी ते जात होते. त्यावेळी, अचानक लिफ्ट बिघडल्याने अपघाताची घटना घडली. त्यावेळी, या लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी बाहेर पडले. त्यामुळे, अनेकांचा जीव भांड्या पडला. मनोज जरांगे यांच्यावर मराठा युवकांसह लाखो कार्यकर्ते प्रेम करतात. त्यामुळे, त्यांची विशेष काळजी देखील घेतली जाते. त्यांच्यासोबत पोलिसांची सुरक्षा देखील कायम असते









