बीड जिल्ह्यातील 189 शेतकर्यांचा समावेश
बीड, (रिपोर्टर)ः- महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलद्वारे शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात येत असतात. अर्ज दाखल केल्यानंतर काही महिन्याने त्याची सोडत जाहिर होते. कृषी यांत्रिकी करणाची सोडत 1 ऑगस्ट रोजी जाहिर करण्यात आली. यामध्ये बीड जिल्ह्यातील 189 शेतकर्यांची निवड झाली असून या शेतकर्यांना पेरणीचे यंत्र मिळणार आहेत. हे यंत्र घेण्यासाठी शेतकर्यांना वेबसाईटवर कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत. यंत्र घेण्यासाठी शेतकर्यांकडे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे.
कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज दाखल केले जात असतात. हे अर्ज सोडत पध्दतीने निकाली काढले जातात. कृषी यांत्रिकी करणासाठी राज्यभरातून हजारो अर्ज आले होते. हे अर्ज 1 ऑगस्ट रोजी निकाली काढण्यात आले. बीड जिल्ह्यातील 189 शेतकर्यांची निवड करण्यात आली आहे. या शेतकर्यांची नावे यामध्ये आलेली आहेत. त्या शेतकर्यांना आता आपली विविध कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करायची आहेत. यांत्रिकीकरणार्या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकर्याकडे किंवा घरातील सदस्याकडे ट्रॅक्टर असणे गरजेचे आहे.








