
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बीड, (रिपोर्टर)ः- जिल्हा रूग्णालयामध्ये गेल्या काही दिवसापुर्वी प्रसृती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी व नर्स वर कारवाई करण्यात यावी व कुटूंबियास 25 लाखांची आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
छाया गणेश पांचाळ या महिलेचा जिल्हा रूग्णालयात प्रसृती दरम्यान मृत्य झाला होता. या प्रकरणी परिचारिकेचे निलंबन करण्यात आले. मात्र हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सव राऊत यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व नर्स यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच पांचाळ कुटूंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी किशकिंदा पांचाळ सह आदींची उपस्थिती आहे.








