गेल्या तीन -चार दिवसात पडणार्या पावसामुळे पिकांना जीवदान
बीड (रिपोर्टर): गेल्या दोन-तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस सर्वत्र पडत आहे. या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस या पिकांना चांगला फायदा होणार आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कालपर्यंत झालेल्या पावसाचे प्रमाण हे 235.9 मि.मी. इतका आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 182.0 मि.मी. पाऊस कमा झाला आहे. काल जिल्ह्यात 13.4 मि.मी. इतका पाऊस झाला.
बीड जिल्ह्यातील पावसाचे वार्षिक प्रमाण हे सरासरी 566.1 मि.मी. इतके आहे. गेल्या वर्षी आजच्या तालखेपर्यंत 417.6 मि.मी. इतका पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्यावर्षी खरीपासोबतच रब्बीची पिकेही जोमात आली होती. अनेक शेतकर्यांनी गेल्यावर्षी कापूस आणि सोयाबीनचे पिके काढून रब्बी हंगामातील उन्हाळी बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात काढली होती. कालपर्यंत बीड जिल्ह्यात 235.9 इतका पडला आहे. तर जून ते ऑगस्टपर्यंत पावसाची सरासरी मात्र कमी झाली आहे. येत्या दोन महिन्यांत आणि विशेषत: बीड जिल्ह्यात परतीचा पाऊस हा समाधानकारक असतो त्यामुळे जिल्ह्यातील छोटे आणि मध्यम प्रकल्प भरली तर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत नाही. काही बोटावर मोजण्याइतकी धरणे सोडली तर जिल्ह्यातील अनेक धरणांनी सरासरी इतकी पाण्याची पातळी गाठलेली नाही.








