
नवनाथ बाबा सह संत महंतांच्या उपस्थितीत सप्तह सांगता
बीड (रिपोर्टर): विसाव्या शतकातील महान सद्गुरू संत किसन बाबा महाराज यांच्या 27 व्या पुण्यस्मरणार्थी गुरुवर्य शांतीब्रह नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व गुरुवर्य किसन बाबा महाराज यांची 27 वी पुण्यतिथी आज पहाटे गुरुवर्य किसन बाबा महाराज यांच्या समाधीची विधिवत गुरू पूजन महंत गुरुवर्य शांतीब्रह श्री नवनाथ बाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी 12 वाजता प्रतिवर्षी प्रमाणे विदर्भरत्न रामायणाचार्य ह.भ.प.संजयजी महाराज पाचपोर बुलढाणा यांचे काल्याच्या कीर्तनाने झाली आहे. या कीर्तनसाथ नानाभाऊ लांडे महाराज, व लक्ष्मीकांत म कदम मृदंगसाथ धनंजय महाराज बोंगाने , अनिकेत महाराज लांडे यांची कीर्तनात मृदुंग साथ दिली टाळकरी, वारकरी, यांच्या सह भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी मध्ये गुरुवर्य किसन बाबा महाराज यांच्या 27 व्या पुण्यस्मरणार्थी अखंड हरिनाम सप्ताह व पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला.








