
आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही
बीड, (रिपोर्टर)ः- सासरच्या जाचास कंटाळून एका 21 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना काल भवानवाडी येथे घडली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. दरम्यान महिलेने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही.
अश्विनी सोमनाथ मुंडे (वय 21 रा.भवानवाडी) या महिलेचे काही वर्षापुर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर या महिलेचा सासरच्या मंडळीकडून छळ केला जावू लागला. या छळाला कंटाळून काल अश्विनी हिने गळफास घेवून आत्महत्या केली. मृतदेह जिल्हा रूग्णालयामध्ये आणण्यात आला होता. आज दुपारी 12 वाजेपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते.महिलेने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे समजू शकले नाही या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.








