• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

चार दशकात प्रथमच जिल्ह्याला मंत्रिपद नाही, भाजपचं सत्ताकारणाचं राजकारण, जिल्ह्याच्या लालदिव्याचं धु्रविकरण

by Beed Reporter
August 10, 2022
Reading Time: 1 min read
0
चार दशकात प्रथमच जिल्ह्याला मंत्रिपद नाही, भाजपचं सत्ताकारणाचं राजकारण, जिल्ह्याच्या लालदिव्याचं धु्रविकरण
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत । बीड

राज्याच्या राजकारणात गेली चार दशके अधीराज्य गाजवणार्‍या बीड जिल्ह्याला आता मात्र राजकीय मागासपण आल्याचं चित्र काल दिसून आलं. राजकीय सारीपाटावर बीड जिल्ह्याला अनन्य साधारण महत्त्व असतांना कधी उपमुख्यमंत्रीपद कधी विरोधीपक्ष नेतेपद तर कधी चांगल्या खात्याचे मंत्रीपद वाट्याला येणार्‍या बीड जिल्ह्याला शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये एकही मंत्रीपद न मिळणं हे भाजपाचं बेरजेचं गणित की भाजपाला पक्षातूनच आव्हान देणार्‍यांना वजाबाकीचे इशारे हे अद्याप जरी समजून येत नसले तरी ते चालू मंत्रीमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमातून उमजून घ्यावे लागतील. राज्याच्या राजकारणावर पकड असणार्‍या बीड जिल्ह्याकडे मंत्रीमंडळाचं दुर्लक्ष हे संकेत भाजपाच्या जिल्हा नेतृत्वासाठी अवघड आहेत की, शिंदे-फडणवीसांच्या जोडगोळीला सत्ताकारणाच्या राजकारणात बीडची गरज नाही. यावर पदासाठी प्रयत्नशील असणार्‍यांना चिंतन आणि मंथन करण्याची जेवढी गरज आहे तेवढीच बीड जिल्ह्याचा विकास करू पाहणार्‍यांना शिंदे-फडणवीसांच्या या भुमिकेवर थेट हल्लाबोल करण्याची गरजही म्हणावी लागेल.

गेल्या चाळीस वर्षांच्या कालखंडामध्ये जेवढे काही सरकार राज्यामध्ये येवून गेले त्या सरकारच्या कालखंडामध्ये बीड जिल्ह्याला अनन्य साधारण महत्त्व देत मानाचं स्थान सातत्याने देण्यात आलं. गेल्या दोन दशकांपूर्वीचा बीड जिल्ह्याचा राजकीय इतिहास खंगाळला तर त्यात क्षीरसागर, पंडित, सोळंके, दौंड, आडसकर हे राजकीय घराणे लालबत्तीत कायम दिसले. त्यापाठोपाठ मुंदडांसारख्या महिला नेतृत्वालाही लालदिवा देण्यात आला. जसे जसे दिवस जात गेले राजकारणातलं समाजकारण यात ध्रुवीकरण होत गेलं. मतदारसंघाचा आवाका वाढत गेला. लोकांच्या अपेक्षा वेगळ्या होत राहिल्या. राजकारण हे विकासावर न जाता धर्म आणि जातीच्या विळख्यात अडकत गेले, तसे बीड जिल्ह्याचे नेतृत्व बदलत गेले. मात्र त्या बदलत्या नेतृत्वातही बीड राज्याच्या राजकारणावर दबदबा ठेवून राहिला. चाळीस वर्षांच्या कालखंडामध्ये बीड जिल्ह्याला मंत्रिपद मिळत गेलेले असताना आता तोडफोड करून सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात बीड जिल्ह्याला स्थान का नाही? याचे पक्षीय, राजकीय आणि सत्ताकारणांचे बेरीज-वजाबाकीचे अनेक गणिते राज्य नेतृत्व मांडत असेल, मात्र इ.स. 1978 सालापासून लालबत्तीच्या प्रकाशात असणार्‍या बीड जिल्ह्याला 2022 साली मात्र मंत्रिपदाचा अंधार अनेक इशारे देऊन जातो. स्व. सुंदरराव सोळंके यांच्या रुपाने इ.स. 1978 ला बीड जिल्ह्याला पहिले उपमुख्यमंत्रीपद मिळाले, त्यानंतर थेट 1995 ला स्व. गोपीनाथराव मुंडेंच्या नेतृत्वात दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर इ.स. 1988 पासून पंडितराव दौंड, शिवाजीराव पंडित, प्रा. सुरेश नवले, भाजप पुरस्कृत बदामराव पंडित, विमलताई मुंदडा, जयदत्त क्षीरसागर, पंकजा मुंडे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, धनंजय मुंडे यांच्यापर्यंत बीड जिल्ह्याला मंत्रिपदाने महाराष्ट्रात सरकार चालवणार्‍यांनी गौरविले. या सर्व लोकांना मिळालेल्या संधीचा जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी फायदाच झाला. स्व. गोपीनाथराव मुंडे हे जेव्हा लालबत्तीतच परंतु विरोधी पक्षनेतेपदावर होते तेव्हा अखंड महाराष्ट्राला लालबत्तीतल्या विरोधी पक्षनेतेपदाचे महत्व समजून आले. सत्ताधार्‍यांना चुकल्यानंतर सुतासारखे सरळ कसे करता येईल हे बीडने दाखवून दिले. ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे यांचा विरोधी पक्षनेते पदावरील कार्यकाळ महाराष्ट्राच्या प्रकाशझोतात आला त्याप्रमाणेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेले धनंजय मुंडे यांनीह आपल्या अभ्यासू नेतृत्वातून जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व केले. इतिहास सांगण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच, बीड जिल्ह्याचा व्यक्ती मंत्रिपदावर गेल्यानंतर त्याचा फायदा जेवढा बीड जिल्ह्याला होतो तेवढाच अखंड महाराष्ट्राला होतो यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र अशा स्थितीत बीडला डावलणं जाणं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बीडकडे दुर्लक्ष असणं की, भाजपाचे आणि खासकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बीडला डावलण्यातलं हे राजकारण आता समजून घ्यावा लागेल. राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेसारख्या पक्षाला फोडून भाजपाने राज्यात सत्ता स्थापन केली. इथपर्यंत आपण राजकारण समजू शकू, परंतु भाजपाच्या विरोधात जाईल त्याचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असे उघडपणे भाजपाचे राज्याध्यक्ष सुशिल मोदी यांनी काल म्हटले आहे. बिहारमधील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना अन् मुख्यमंत्री नितीशकुमार यांना इशारा देताना महाराष्ट्राचं अन् शिवसेनेचं उदाहरण दिलं. मोदींच्या वक्तव्याची इथे दखल एवढ्यासाठीच घ्यायची आहे केंद्रीय भाजप असो अथवा राज्याची भाजप असो विचारसरणी एकच. भाजपाला विरोध करणार्‍यांना संपवायचे, मग तो पक्षाचा असेल अथवा पक्षाच्या बाहेरचा. बीड बाबतही तेच झाले का? पंकजा मुंडे आणि राज्यात भाजपाचं नेतृत्व करणार्‍या फडणवीसात गेल्या काही दिवसांपासून विस्तव जात. मग गेल्या तीन वर्षांच्या कालखंडामध्ये पंकजा मुंडेंना कधी विधान परिषद कधी राज्यसभेत डावलून फडणवीसांनी आपली ताकद दाखवून दिली. आता पुन्हा भाजप सत्तेत आल्यानंतर कालच्या मंत्रिमंडळात पंकजांना संधी न देणं आणि इथेही डावलणं फडणवीसांचे हे संकेत बिहारच्या मोदींनी दिलेल्या इशार्‍याशी जुळतेत का? हे तपासणं नितांत गरजेचं आहे. जर तो अंतर्गत पक्षीय वादाच्या विषयातून बीडला मंत्रिपद नसेल तर हा त्या पक्षाचा अंतर्गत कलहातला हेतू म्हणू. परंतु यामध्ये बीडचे तर नुकसानच आहे, इथे सुरेश धस, लक्ष्मण पवार, मुंदडा हे भाजपाचे आमदार असताना बीडसारख्या संवेदनशील राजकारण करणार्‍या कर्तृत्वान जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर का ठेवले? यावर मंथन करत असताना भारतीय जनता पार्टीची ही सत्ताकारणाचे गणित जुळवणारे सत्ताधीश आहेत. आगामी स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने एकतर हा मंत्रिमंडळाचा विस्तार भाजपाकडून करण्यात आला. खासकरून जिथे महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी मंत्रिपद देण्यात आले. दुसरीकडे शिवसेनेचा फुटीरगट असलेला शिंदे यांनी ज्या मंत्र्यांना मंत्री केले त्यात गटाचे भविष्य पाहण्यापेक्षा आता आपण फुटलोत त्यात आपण तुटू नये, अशा पद्धतीने शिंदे गटानी मंत्रिपद दिल्याचे दिसून येते. संजय राठोडसारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेणे अथवा अब्दुल सत्तारांसारख्या व्यक्तीने थयथयाट केल्यानंतर त्यांना लालबत्तीत सामावून घेणे हे जेवढे बोलके चित्र कालच्या मंत्रिमंडळात पहावयास मिळाले त्यातून सरळसरळ एकच अर्थ निघतो. देवेंद्र फडणवीसांच्या भाजपाने सत्ताकारणाच्या राजकारणात बीड जिल्ह्याला वगळलं.

Previous Post

मोदी-शहा ही लुटारुंची टोळी – राजेसाहेब देशमुख, काँग्रेसच्या ‘आझादी का गौरव’ पद यात्रेचे गेवराई जंगी स्वागत

Next Post

केंद्रेकरांचा अचानक दौरा, अधिकार्‍यांसोबत बैठका , तुतीला वृक्ष समजू नका

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
केंद्रेकरांचा अचानक दौरा, अधिकार्‍यांसोबत बैठका , तुतीला वृक्ष समजू नका

केंद्रेकरांचा अचानक दौरा, अधिकार्‍यांसोबत बैठका , तुतीला वृक्ष समजू नका

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?