
अधिवेशनात हत्येचा मुद्दा उपस्थित करणार -नाईकवाडी
बीड/जामनेर (रिपोर्टर): जामनेर तालुक्यातील बेटावत (बु.) येथील एका युवकावर प्राणघातक हल्ला करून त्यास ठार करण्यात आले. या घटनेने अवघ्या राज्यात नव्हे तर देशात खळबळ उडाली आहे. मयत मुलाच्या कुटुंबियांची आ. इद्रिस नाईकवाडी यांनी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. हा मुद्दा विधिमंडळामध्ये उपस्थित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आ. नाईकवाडी यांनी म्हटले.
सुलेमान खान या तरुणावर काही टोळक्यांनी हल्ला करत त्यास मारहाण करून त्याचा निर्घृणपणे खून केला. या घटनेने अवघ्या देशामध्ये खळबळ उडाली आहे. सुलेमान यांचे वडील रहीम कान पांण यांची नाईकवाडी यांनी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. सदरील घटनेचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करून या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे तसेच अल्पसंख्याक मुस्लिमांवर अपाण अन्याय होऊ देणार नाही, असे नाईकवाडी यांनी म्हटले. नाईकवाडी यांच्या समवेत हसीन अख्तर, फारुक शेख, मुफ्ती खलील, हाफीज रहीम पटेल, मतीन पटेल, अन्वर शिकलकर सह आदी उपस्थित होते.





