
सरकारी दवाखान्यासमोर कर्मचार्याचे तिव्र निदर्शने
बीड, (रिपोर्टर)ः- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी काही दिवसापासून बेमुदत संप पुकारल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. आज सकाळी या कर्मचार्याने जिल्हा रूग्णालयासमोर तिव्र निदर्शने केले. यावेळी अनेक कर्मचार्यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणार्या कर्मचार्यांच्या मागण्याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे. या मागण्या संदर्भात अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र याची दखल घेतली जात नाही. आपल्या मागण्या मंजूर केल्या जात नसल्याने गेल्या काही दिवसापासून या कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपाचा फटका आरोग्य विभागाला बसला असून व्यवस्था कोलमडून पडली आहे. आज सकाळी या कर्मचार्यांनी जिल्हा रूग्णालयासमोर तिव्र निदर्शने केली आहेत.






