
दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई, (रिपोर्टर)ः- अंबाजोगाईचे डीवायएसपी ऋषीकेश शिंदे यांनी परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील पत्त्याच्या क्लबवर छापा टाकून दोन लाख 63 हजारांचा मुद्देमाल जप्त करून दहा जणांना ताब्यात घेतले आहे.
धर्मापुरी येथे पत्त्याचा क्लब सुरू असल्याची महिती डीवायएसपी ऋषीकेश शिंदे यांना झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकून दहा मोबाईल, तीन मोटार सायकल असा एकूण 2 लाख 63 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. सदरील ही कारवाई डीवायएसपी शिंदे, पीएसआय संजय फड, बीटअंमलदार रमेश तोटेवाड यांनी केली आहे.








