शिरूर (रिपोर्टर): तोंडाला मास्क बांधून मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात दोघांनी घराचा कोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करत नगदी दीड लाख रुपयांसह 4 लाख 56 हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याची घटना 26 ऑगस्ट रोजी शिरूर तालुक्यातील मानूर येथे घडली.
याबाबत अधिक असे की, शिरूर तालुक्यातील मानूर येथील खाजू अन्सू पठाण (वय 35 वर्षे) यांच्या मानूर येथील राहत्या घरी 26 ऑगस्ट रोजी 11.45 ते 12.15 च्या दरम्यान मोटारसायकलवर दोन अनोळखी चोरटे आले, त्यांच्या तोंडाला काळ्या कपड्यांचे मास्क लावलेले होते. त्यांनी आधी पठाण यांच्या घराचा कडीकोंडा तोडला. त्यानंतर त्यांनी घरामध्ये प्रवेा करत सुमारे 98.8 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने व नगदी दीड लाख रुपये असा एकूण 4 लाक 46 हजार 885 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी खाजू पठाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात गु.र.नं. 245/2025 कलम 331, (3) 305, 3 (5) बीएनएस 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पो.उपनिरीक्षक कुलकर्णी हे करत आहेत.






