
बीडचं आरक्षण अनु.जाती महिलेसाठी
बीड, (रिपोर्टर)ः- स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणूका येत्या काही दिवसामध्ये होत असल्याने आज राज्यातील 32 जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे अडीच वर्षासाठीचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. यामध्ये बीडचे जि.प.चे आरक्षण अनुसुचित जाती महिलेसाठी सुटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणूका येत्या काही दिवसामध्ये होणार आहेत. आज निवडणूक विभागाने राज्यातील 32 जि.प. अध्यक्षपदाचे आरक्षण जाहिर केले आहे. बीडचं आरक्षण कशासाठी सुटते याकडे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागून होते. बीड अनुसुचित जाती महिलेसाठी राखीव आहे. सदरील हे आरक्षण अडीच वर्षासाठी आहे.








