
बीड जिल्ह्यात जातीयवाद निर्माण करण्याचा धोका
एसपी साहेब, त्या बॅनरबाजांच्या मुसक्या बांधा
वादग्रस्त बॅनरला बंदी घाला
लोका हो, जातीयवाद निर्माण करू पाहणार्या नतदृष्टाला तिथली तिथंच ठेचा किंवा पोलिसांच्या हवाली करा
बीड, (रिपोर्टर)ः- राजकीय, सामाजिक दृष्ट्या संवेदनशिल असलेल्या बीड जिल्ह्यात मराठा विरूध्द ओबीसी हा वाद लावण्यासाठी काही नतदृष्ट प्रयत्नशील असल्याचे प्रर्कशाने दिसून येवू लागले आहे. गेल्या पंधरा दिवसाच्या कालखंडात बीड जिल्ह्यातील काही भागात बॅनर वॉर झाले. कुठे मराठ्यांचे बॅनर फाडण्यात आले तर कुठे ओबीसींचे बॅनर फाडण्यात आले, कुठे ओबीसींच्या बॅनरला काळे फासण्यात आले तर कुठे मराठ्यांच्या बॅनरची चिरफाड करण्यात आली. यातून दोन समाजाला आमने-सामने आणत बीडच्या शांततेला धक्का पोहचवत वाद कसा निर्माण होईल. यासाठी प्रयत्न केले गेले. अशा नतदृष्टांना पोलिसांनी तात्काळ शोधून त्यांच्यावर कारवाई करायला हवी.
दुसरीकडे ज्या बॅनरमुळे अशांतता निर्माण होवू पाहते, त्या बॅनरवर जिल्ह्यात काही काळ जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी थेट बंदी आणावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होतांना दिसून येते. सामाजिक, स्वास्थय बिघडू पाहणार्यांना जात, धर्म याच्याशी देणं घेणं नसतं. त्यांना केवळ आपल्या कु-बुध्दीतून अशांती निर्माण करत असुरी आनंद किंंवा स्वार्थ साधायचा असतो. त्यामुळे अशा नतदृष्टांना खरं तर ओबीसी असो, मराठा असो अथवा अन्य कुणच्याही जातीचा असो त्यांनी उघडच पाडायला हवं.
बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये बॅनरवरून ओबीसी विरूध्द मराठा असा वाद खदखदत आहे. कुठे ओबीसींच्या बॅनरची फाडाफाड होते त्यावर काळे फासले जाते, कुठे मराठा समाजाच्या बॅनरची फाडाफाड होते काळं फासलं जातं, काही ठिकाणी अभद्र भाषेत बॅनर लावले जातात, काही ठिकाणी आव्हान देणारे बॅनर लावले जातात. हे बॅनर अचानक कोणी तरी लावून जातं. त्याचं नाव अथवा पत्ता नसतो. मात्र सकाळी याच बॅनरमुळे दोन जाती एकमेकांसमोर उभ्या राहतात, गावात तणावाचे वातावरण निर्माण होते. तो तणाव अवघ्या जिल्हाभरात पसरतो आणि उगाच दोन जातीच्या लोकांमधील मनात एकमेकांविरोधात मळद निर्माण होते, असंतोष निर्माण होतो अन् इथेच कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न आ.. वासून उभा राहतो. तेच धंदे काही नतदृष्ट सध्या बीड जिल्ह्यात करत आहेत.
दोन जातींना आमने-सामने आणून एकमेकांविरोधात मळद निर्माण करून जातीयवाद वाढवत आहेत. सदरचा विषय अत्यंत गंभीर आहे अशा गंभीर प्रकरणात शासन, प्रशासन व्यवस्थेने जेवढे सगज आणि दक्ष त्याच बरोबर कठोर रहायला हवे त्या प्रमाणेच सर्व सामान्य व्यक्तींनीही अशा नतदृष्टांना पोलिसांच्या हवाली करायला हवे. सदरचा प्रकार हा बॅनरबाजीतून घडत असल्याने एसपी साहेबांनी असे बॅनरच आता लावण्यास बंदी आणावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
लोकाहो…त्या नतदृष्टांना थारा देवू नका
बीड जिल्ह्यात जातीयवाद निर्माण करण्यासाठी काही नतदृष्ट ओबीसी विरूध्द मराठा हा वाद निर्माण करण्या हेतू पुढे सरसावले आहेत. वादग्रस्त बॅनर लावून दोन जातीत तेढ निर्माण करू पाहत आहेत. लोकांहो अशा नतदृष्टांना ओळखा, त्यांचे मनसुंबे पुर्णत्वात जावू देवू नका. एक तर अशांना तिथली तिथेच ठेचा, त्यांचे विचार हाणून पाडा. नसता थेट त्यांना पोलिसांच्या हवाली करा.
एसपी साहेब आधी त्यांच्या मुसक्या बांधा
बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसाच्या कालखंडात ओबीसी आणि मराठा समाजाचे बॅनर फाडणे, त्यावर काळे फासणे, आव्हानात्मक बॅनर लावणे यासारखे प्रकार घडले आहेत. यातून काही ठिकाणी तणाव निर्माण झाले. दोन जाती आमने-सामने आल्या. घोषणाबाजी झाल्या. या प्रकरणात गुन्हे ही दाखल आहेत. मात्र असे बॅनर लावणार्यांचे मुसक्या बांधा, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, हे प्रकरण गांभीर्याने घ्या.
थेट बॅनरलाच बंदी घाला
होय…जिथे आव्हानात्मक भाषा आहे, जिथे स्वःजातीचा अभिमान आणि दुसर्या जातीची अवहेलना. तिथे फटका पाहिजेच, नक्कीच… स्वतःच्या जातीचा गर्व असायला हवा परंतु अन्य जातीचा सन्मानच पाहिजे. परंतु काही नतदृष्ट अवलादी केवळ जातीय वाद निर्माण करण्या हेतू वादग्रस्त बॅनर लावतात. त्यामुळे अशा बॅनरलाच बंदी घाला अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.








