
नराधम आरोपी अटक
वडवणी, (रिपोर्टर)ः- मामाच्या गावी आलेल्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 28 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील देवळा येथे घडली. या प्रकरणी आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील 12 वर्षीय मुलगी देवळा येथील आपल्या मामाच्या गावी आली होती. त्या गावातील अशोक बाबासाहेब टपरे (वय 25) या नराधमाने सदरील मुलीवर बलात्कार केला. हा प्रकार मुलीने आपल्या आईला व नातेवाईकांना सांगितल्यानंतर या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आरोपी टपरे यांच्या विरोधात कलम 64/64 (2) (आय), 75/35 (3) सह कलम 4/8/12 लैगिंक अपराध यासह 6/3 (आय)(डब्ल्यु)(आय) (आय,आय)/3 (2) (व्ही) भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.








