
केजमध्ये ओबीसींचा भव्य मोर्चा
केज, (रिपोर्टर)ः- ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येवू नये या प्रमुख मागणीसाठी आज ओबीसी समाजाच्या वतीने केज तहसिलवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा भवानी चौकातून निघाला होता. मोर्चाला लक्ष्मण हाके मार्गदर्शन करणार आहेत. मोर्चाचे रूपांतर बाजार समिती मैदानावर सभेत होणार आहे.
राज्य सरकारने ओबीसी आरक्षण अबाधित ठेवावे या आरक्षणाला धक्का लावू नये या प्रमुख मागणीसाठी आज ओबीसीस समाजाच्यावतीने तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा भवानी चौकातून काढण्यात आला होता. या मोर्चात हजारों ओबीसी बांधवांचा सहभाग होता. मोर्चा तहसिलवर धडकल्यानंतर केज बाजारसमिती मैदानात सभा होणार आहे. या सभेला लक्ष्मण हाके मार्गदर्शन करणार आहेत. मोर्चासाठी केज शहरासह ग्रामीण भागातील ओबीसी बांधव उपस्थित राहिले होते. एकच मिशन ओबीसी आरक्षण यासह इतर घोषणांनी केज शहर दणाणून गेले होते.








