
आज संध्याकाळी दादांचा बीड मुक्काम
सोलापूर/बीड (रिपोर्टर): राज्यभरात मुसळधार पावसाने हाहाकार उडवून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अख्खं मंत्रिमंडळ आज राज्यभरातल्या शेतकर्यांच्या शेतावर जावून पाहणी करत आहेत. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सहा वाजल्यापासून पूरपरिस्थितीची पाहणीला सुरुवात केली. सोलापूरच्या मुंगळी गावात त्यांनी उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधला. या वेळी अजितदादांनी प्रशासनाला पंचनामे त्वरीत करण्याचे आदेश दिले. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असेही अजितदादांनी म्हटले. आज संध्याकाळी ते बीड जिल्ह्यात डेरेदाखल होत असून बीड मुक्कामी राहत अजितदादा बीडच्या भयावह परिस्थितीचा आढावा घेत पाहणी करणार आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असल्याने शेतकरी दादांच्या दौर्याकडे लक्ष ठेवून आहेत.
अजित पवार हे मुंगळी गावात पाहणी करण्यासाठी गेले असता तिथं नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. नागरिकांच्या गराड्यातच अजित पवार पूरपरिस्थिताचा आढावा घेत होते अन् माध्यमांना माहिती देत होते. यावेळी गावकर्यांनी अजित पवार यांच्याकडे आपल्या भावना आणि व्यथा मांडल्या. अजित पवार यांनी यावेळी ज्यांचं खरंच नुकसान झालं आहे त्यांनाच मदत मिळणार असं देखील ठणकावून सांगितलं.मुंगशी गावानं गेल्या अनेक वर्षात असा महापूर पाहिला नव्हता. इथले वयोवृद्ध नागरिकांनी याबाबतची माहिती सांगितली. अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील गावातील नागरिकांशी संवाद साधला.मुंगशी गावातील एका महिलेनं या पुरामुळं आपलं घर कोसळलं असं अजित पवार यांना सांगितलं. यावेळी अजित पवार यांनी कुटुंबातील सर्वच व्यक्तींची विचारपूस केली. मुलगा पीएसआय आहे असंही या महिलेनं सांगितलं.
दरम्यान, अजित पवार यांनी प्रशासनाला पंचनामे त्वरित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी एक महिलेने तिचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अजित पवारांनी महिलेला तुमचा व्यवसाय काय?, असा प्रश्न विचारला. तसेच तुला मुलं किती?, असा सवालही अजित पवारांनी सदर महिलेला विचारला.यानंतर महिला आपल्या मुलांची संख्या आणि मुलं, मुली किती हे देखील साांगितलं. त्यावेळी आपल्या मिश्किल स्वभावासाठी ओळखल्या जाणार्या अजित पवार यांनी मुलगा कितवा झाला अशी विचारणा केली. त्यावेळी महिलं पहिल्यांदा मुलगा झाल्याचं सांगितलं. त्यानंतर अजित पवार हसले अन् जाऊ दे आता असं म्हणाले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना देखील हसू आवरलं नाही.








