
गंभीर जखमी, माजलगावात उपचार सुरू
हाकेंनी घेतली एसपींची भेट, आरोपींना अटक करण्याची मागणी
माजलगाव (रिपोर्टर):- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे पवन करवर हे आपल्या तीन मित्रांसमवेत माजलगाव जवळच्या सावरगाव जवळ एका हॉटेलवर जेवण करत होते. त्या वेळी अचानक चाळीस ते पन्नास जणांनी त्याठिकाणी येत पवन करवरवर हल्ला चढवला. या वेळी त्यांचे तीनही साथीदार शेजारच्या शेतातील उसात जाऊन लपले. या वेळी पवन यांना बेदम मारहाण केली गेली. या घटनेची माहिती माजलगाव पोलीसांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पवन करवर यांना उपचारासाठी माजलगावच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेत या प्रकरणातील दोघांची नावे एसपींना देऊन त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी हाकेंनी या प्रकरणी केली.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे खंदे समर्थक पवन करवर हे काल माजलगाव तालुक्यामध्ये होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पारगाव ते सावरगाव दरम्यान ते जेवण करण्यासाठी एका हॉटेलवर थांबले. त्यावेळी अज्ञात 40 ते 50 जणांनी त्याठिकाणी येऊन पवन करवर यांच्यावर हल्ला चढवला. त्यावेळी त्यांचे तीनही मित्र घटनास्थळावरून शेजारच्या शेतात जावून लपले. या मारहाणीत पवन करवर गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी माजलगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबर नितीन जगताप, प्रवीण जगताप या दोघांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. हे दोघेही गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप हाके यांनी केला. सदरची मारहाण नेमकी कशामुळे झाली, याबाबत पोलीस तपास करत आहेत.









