
मी आहे, मी सर्व करून देईन, लग्न दिवाळीतच होईल -आ. धनंजय मुंडेंनी पुसले पुरग्रस्त महिला शेतकर्याचे अश्रू
परळी (रिपोर्टर): परळी तालुक्यातील शेती पिकं पुर्णत: उद्ध्वस्त झाले. या पिकांची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री तथा आ. धनंजय मुंडे थेट बांधावर जात आहेत. आज त्यांनी तेलसमुप येथील शेती पिकांची पाहणी केली. या वेळी एका महिलेने आपली व्यथा मांडली. व्यथा मांडताना तिला अश्रू अनावर झाले. या वेळी मुंडे यांनी या महिलेचे अश्रू पुसत ‘तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, तुमच्या मुलीचं लग्न वेळेवर होईल, मी सर्वस्वी मदत करेेल,’ असे आश्वासन आ. मुंडे यांनी महिलेस केले.
परळी तालुक्यातील तेलसमुप, बोरखेड, ममदापूर आदी गावांमधील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. माजी मंत्री तथा आ. धनंजय मुंडे यांनी आज तेलसमुप येथे एका शेतातील पिकाची पाहणी केली. त्या वेळी तेथील एका शेतकरी महिलेने आपली व्यथा मांडली.
परळी वैद्यनाथ तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदी गावांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या उभ्या पिकांवर अक्षरशः संकट कोसळले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे आज दौर्यावर आहेत.
तेलसमुख येथे पाहणी दरम्यान हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग घडला. एका शेतकर्याच्या संपूर्ण कापसाच्या उभ्या पिकाचे मुसळधार पावसाने पूर्ण नुकसान केले. संबंधित शेतकर्याच्या मुलीचे लग्न यंदाच्या दिवाळीत ठरलेले आहे. लाखोंचे नुकसान आणि हाती आलेले पीक पूर्णतः नष्ट झाल्यामुळे शेतकरी महिलेला भविष्यातील अनिश्चिततेचे ढग डोळ्यांत अश्रू आणून गेले.
=ब्/ शेतकरी महिलेनं भावनिक होऊन धनंजय मुंडेंना विचारलं – भाऊ, आता लेकीचं लग्न कसं लावू? लाखोंचं नुकसान झालं पिकं उद्ध्वस्त झाली.
यावर धनंजय मुंडेंनी तत्काळ दिलासा देत उत्तर दिलं – अक्का, मुलीच्या लग्नाची काळजी अजिबात करू नका. शासन तुमच्या मदतीसाठी उभं आहेच. पण मीही तुमच्यासोबत आहे. ठरलेल्या वेळेत, दिवाळीतच लग्न होईल. त्याच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो.
या आश्वासनाने शेतकरी महिलेला मोठा दिलासा मिळाला आणि उपस्थित शेतकरी व गावकर्यांच्या डोळ्यांतही अश्रू दाटले.
यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत अजय मुंडे, राजाभाऊ पौळ, सूर्यभान मुंडे, जानिमिया कुरेशी, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
परळी वैद्यनाथ तालुका, जि. बीड अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देणारा धनंजय मुंडेंचा मानवी चेहरा








