
दिवस रात्र पावसाचे थैमान पिके कमरेएवढया पाण्यापर्यंत तरंगतायत,शेताला गावांना तळ्याचे स्वरूप
आष्टी (रिपोर्टर):-तालुक्यात मागिल 15 ते 20 दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून मुसळधार पाऊस सुरू असून, पुन्हा एकदा शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.तालुक्यात सतत पाऊस बरसत असल्याने सर्वदूर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आष्टी तालुक्यात मागिल 24 तासात पावसाने हाहाकार माजवला आहे.शेतकर्यांची पिके कमरे एवढ्या पाण्यापर्यंत आली आहेत.सोयाबीन, उडीद ,तुर कापूस पाण्यात आहेत. अनेक शेतकर्यांच्या घरात पाणी शिरल्याने प्रपंच रस्त्यावरती आले असून तात्काळ प्रशासनाकडून मदतीची गरज असून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून केली जात आहे. अनेक गावांचे संपर्क तुटून पुल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत व नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.सखल भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून शनिवारी व रविवारी 24 तास मुसळधार पाऊस बरसत असल्याने आष्टी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून झालेल्या नुकसानीची तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी जाऊन पाहणी करून प्रशासन तात्काळ पंचनामे करण्यास कटिबद्ध असल्याचा विश्वास शेतकर्यांना दिला आहे.
आष्टी तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गावांना तळ्याचे स्वरूप आले आहे. अनेक गावांच्या नद्यांना पूर आले असून पुराचे पाणी गावांमध्ये देखील शिरल्याच्या घटना घडल्या आहेत पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत वाघुळज येथील पुल पावसाने वाहून गेल्याने रात्रीपासून अहिल्यानगर ते बीड हे वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्यासह स्थानिक व प्रशासनाच्या साह्याने तात्काळ दुरुस्त करण्याची प्रगतीपथावर काम सुरू असून एक ते दोन तासांमध्ये हा मार्ग सुरू करणार असल्याचे सपोनि मंगेश साळवे यांनी सांगितले तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ओढे नाल्यांना पाणी आले आहे. वाघुळुज,सुलेमान देवळा, पिंपरखेड,हिवरा,देवीनिमगांव,नांदूर,क-हेवडगांव येथील पुलावरून पाण्याच प्रवाह असल्याने वाहतूक ठप्प होत्या.पूर्णा तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नद्यांना ओढ्यांना पूर आलाय. या पुराचे पाणी शेतीत शिरले असून आता शेतकर्यांची पिके कमरे एवढ्या पाण्यात तरंगताना दिसतात. सोयाबीन,कांदा,तुर, उडीद कापूस पाण्यात गेली आहेत. शेतकरी हतबल झालाय. पाण्याखालील पिकांची परिस्थिती पाहून शेतकर्यांनी सरकारकडे कर्जमाफी आणि सरसकट मदत देण्याची मागणी केली आहे.
तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे अजूनही अनेक गावांना पुराचा धोका कायम आहे.नदी काठच्या नागरीकांना प्रशासनाकडून या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दक्षता बाळगावी असे, आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.
बीड अहिल्यानगर महामार्गावरील रात्रीपासून वाहतूक ठप्प
तालुक्यात सर्व दूर मुसळधार पावसाने सर्व नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्याने बीड अहिल्यानगर महामार्गावरील वाघळुज येथील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक रात्रीपासून ठप्प असून पोलीस प्रशासन सपोनि मंगेश साळवे यांच्यासह प्रशासन, स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवरती मार्ग सुरळीत करण्यासाठी काम सुरू असून लवकरच मार्ग सुरळीत सुरू करणार असल्याचे सपोनि मंगेश साळवे यांनी सांगितले








