केज : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक बीड जिल्ह्याचे सुपुत्र माजी आ.विनायक मेटे यांचे झालेले अपघाती निधन मनाला चटका लावणारे आहे. अतिशय प्रतिकूल पारस्थितीतून घडलेले हे नेतृत्व होते. घरात कोणताही राजकीय वारसा नसताना महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असलेले ते नेते होते. विनायक मेटे हे केवळ मराठा समाजाचेच नाही तर सकल समाजाचे ते नेते होते. अति सामान्य कुंटुंबातुन आलेले प्रचंड आत्मविश्वास जिद्द व मेहनतीची पराकाष्ठा म्हणजे विनायकराव मेटे. शिवसंग्रामच्या माध्यमातुन त्यांनी उत्तम संघटन व भरीव सामाजिक कार्य त्यांनी केले. सरकार कोणतेही असो त्यांचे सर्व सर्वाशी अतिशय चांगले संबध असायचे. त्यातुन ते सामाजिक कामे करत होते. बीड जिल्ह्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. बीड चा परत एक उद्धार कर्ता आपण गमावला असून ही पोकळी आता भरून निघने कठीण आहे. विनायक मेटे यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सर्व पाटील परिवार सहभागी आहोत. या धक्क्यातून त्यांच्या कुटुंबाला सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो हीच प्रार्थना. अशा शब्दात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांनी बोलताना भावना व्यक्त केल्या.