
रात्रीतून अख्ख्या गावाचे स्थलांतर
घर, रस्त्याला चिरा पडल्या, गावकरी भयभीत
उपजिल्हाधिकार्यांसह तहसीलदार तळ ठोकून
रात्री गावकर्यांना मंदिरामध्ये हलवले
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात सातत्याने पाऊस पडत आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. बीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथील घराला आणि रस्त्याला भेगा पडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले. रात्री 70 कुटूंबातील 200-250 नागरीकांना कपिलधार येथील देवस्थानात स्थलांतरित करण्यात आले. रात्रीपासून महसूल विभाग गावामध्ये तळ ठोकून आहे. आज सकाळी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, भुसर्वेक्षणचे अधिकारी दाखल झाले होते. गावाचे इतर ठिकाणी स्थलांतर करावे अशी मागणी गावच्या सरपंचासह नागरीकांकडून केली जात आहे.

बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. बीडपासून काही अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र कपिलधार या ठिकाणी कपिलधारवाडी म्हणून गाव आहे. या गावाच्या काही नागरीकांच्या घराच्या भिंतीला व रस्त्यावर भेगा पडल्या. नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. काल महसूल विभाग घटनास्थळी दाखल झाला होता. प्रशासनाने 700 कुटूंबातील 200-250 नागरीकांना कपिलधार मंदिरामध्ये स्थलंतरित केले आहे. आज सकाळी उपजिल्हाधिकारी,तहसिलदार शेळके, भुजलसर्वेक्षणचे अधिकारी दाखल झाले होते. गावाचे इतर ठिकाणी स्थलांतर करावे अशी मागणी सरपंचासह गावकर्यांकडून केली जात आहे. घराला आणि रस्त्यावर भेगा पडल्याने कपिलधारवाडी येथील नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे








