बीड (रिपोर्टर): जमियत उलमाये हिंद (मौलाना महेमूद मदनी गट) च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध मौलाना हजरत मोहम्मद हाफीज नदीम सिद्दीकी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांची सहाव्यांदा ही निवड आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
हजरत मौलाना हाफीज नदीम सिद्दीकी यांचे महाराष्ट्र चांगले कार्य असल्याने त्यांची सहाव्यांदा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या शब्दाला मानणारा वर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या या निवडीने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या वतीनेही त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.








