
बीड, (रिपोर्टर)ः- बीड पासून काही अंतरावर असलेल्या तळेगाव शिवारातील एका 21 वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल घडली. या तरूणाची ओळख पटली असून सदरील हा तरूण बालेपीर येथील असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
तळेगाव शिवारातील एका झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला होता. सदरील हा मृतदेह जिल्हा रूग्णालयामध्ये आणण्यात आला होता. प्रथम मयताची ओळख पटली नव्हती. मात्र त्यानंतर ओळख पटली असून तो इरफान सलीम पठाण (रा.बालेपीर ) असल्याचे निष्पन्न झाले. त्याने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.






