
पाचशे रूपयांच्या 64 नोटा आढळल्या
आष्टी तालुक्यात खळबळ, बनावट नोटा आणल्या कुठून, पोलिसांचा तपास सुरू
आष्टी, (रिपोर्टर)ः- आष्टी तालुक्यातील वाळूंज येथील एका तरूणाकडे बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती आष्टी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सदरील तरूणास ताब्यात घेतले असता. त्याच्या जवळ पाचशे रूपयांच्या 64 नोटा आढळून आल्या. सदरील या तरूणाने या नोटा कोठून आणल्या, याचा मास्टर माईंड कोण त्याने नोटा चलनात आणल्या आहेत का यासह अन्य तपास आष्टीचे पोलीस करत आहेत. तालुक्यात बनावट नोटा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
प्रकाश पाराजी खाडे (वय 24 रा.वाळूंज ता.आष्टी) या तरूणाकडे बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती आष्टी पोलिसांना झाल्यानंतर आष्टी ठाण्याचे प्रविण अर्जुन क्षीरसागर यांनी या तरूणाास रांजनमाता हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका शेडमध्ये पकडले. त्याच्या जवळ जी जे 05 एच.एक्स 1840 या क्रमांकाची दुचाकी होती. सदरील तरूणाची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ 500 रूपयांच्या 64 बनावट नोटा आढळून आल्या. या प्रकरणी प्रविण क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश खाडे यांच्या विरोधात गु.रं.नं. 465/2025 कलम 179, 180 भादंवी नुसान गुन्हा दाखल करण्यात आला. या तरूणाने कुठून नोटा आणल्या, याचा मास्टर माईंड कोण, त्याने नोटा चलनात आणल्यात का, याची टोळी आहे का याचा तपास आष्टी पोलीस करत आहेत. या प्रकरणाने आष्टी तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान बीडमध्येही बनावट नोटा आढळून आल्या होत्या.





