
माळेगाव, सुरूडी, सोनेगाव, सोने सांगवीत पाणी घुसले
मांजराचे सहा दरवाजे 1.50 मिटरने उघडले
केज, (रिपोर्टर)ः- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट निर्माण झाल्याने राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज पहाटे केज तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने या पावसामुळे नद्या नाल्यांना पुन्हा महापूर आला. नदीचे पाणी माळेगाव, सुर्डी, सोनेगाव, सोने सांगवी, मांग वडगाव यासह आदी गावांमध्ये घुसल्याने पुन्हा मोटे नुकसान झाले. मांजरा नदीत पाण्याचा ओघ वाढल्याने धरणाचे सहा दरवाजे 1.50 मिटरने उघडण्यात आल्याने मांजरा नदीला महापूर आलेला आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने राज्यात मोठे नुकसान झाले. आता पुन्हा दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. आज पहाटेच्या दरम्यान तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाने नद्यांना पाणी आले. नदीचे पाणी माळेगाव, सुर्डी, सोने सांगवी, मांग वडगाव या गावात घुसल्याने मोठे नुकसान झाले. आहे ती पिके खराब होवू लागली. मांजरा नदीला महापूर आल्याने धरणाचे सहा दरवाजे 1.50 मिटरने उघडण्यात आले आहेत. नदी काठच्या नागरीकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.









