
दोघांविरोधात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): ऊसतोडणीसाठी दिलेली बाकी थकल्याने एका मजुराचे दोघा जणांनी अपहरण केले असून या प्रकरणी संबंधितांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर उत्तम चव्हाण (रा. माळापुरी ता. बीड) या ऊसतोड मजुराकडे बाकी शिल्लक होती. पैशाच्या कारणातून सदरील मजुराचे सतीश गजेंद्र कडेकर व कल्याण गजेंद्र कडेकर (दोघे रा. चिखलबीड, ता. वडवणी) यांनी अपहरण केले. या प्रकरणी अक्षय प्रेमनाथ शिंदे याच्या फिर्यादीवरून कडेकर बंधुंविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







