
61 गट, 122 गणांचे आरक्षण जाहीर
ग्रामीण भागातील पुढारी लागले आजपासून कामाला
बीड (रिपोर्टर): जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांचे आज आरक्षण काढण्यात आले. यामध्ये काही ठिकाणी तेथील स्थानीक राजकीय पुढार्यांना धक्का बसला तर काहींना सोयीचं झालं. दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या इमारतीत जि.प.गटाचे आरक्षण काढण्यात आले. तर तालुका पातळीवर पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील पुढारी आजपासूनच कामाला लागणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणुका घेण्याच्या हालचाली जोरात सुरु आहेत. जि.प. अध्यक्ष, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता जि.प. गट आणि पं.स. गणांच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज दुपारी जिल्हा परिषद गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण काढण्यात आले तर तालुकापातळीवर पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीकडे अनेक ठिकाणी तेथील राजकीय कार्यकर्त्यांना धक्का बसला तर काहींसाठी गट-गण सोयीचे पडले आहे. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होताच ग्रामीण भागातील पुढारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
तालखेड – अनुसुचीत जाती
केसापुरी – अनुसुचीत जाती
पाटोदा म. -अनुसुचीत जाती महिला
होळ – अनुसुचीत जाती महिला
तेलगाव – अनुसुचीत जाती महिला
पिंप्री बु. – अनुसुचीत जाती
मोहा -अनुसुचीत जाती
जिरेवाडी – अनुसूचीत जाती महिला
चिंचोलीमाळी – ओबीसी महिला
उपळी -ओबीसी महिला
चनई – ओबीसी महिला
बर्दापूर – ओबीसी महिला
नेकनूर -ओबीसी
चकलांबा -ओबीसी
आसरडोह – ओबीसी
धर्मापुरी-ओबीसी
पाडळी -ओबीसी महिला
नांदूरघाट -ओबीसी महिला
अंमळनेर -ओबीसी
उमापूर -ओबीसी महिला
गंगामसला -ओबीसी
आडस -ओबीसी
येवता -ओबीसी महिला
डोंगरकिन्ही -ओबीसी
रेवकी -सर्वसाधारण महिला
तलवाडा -सर्वसाधारण
जातेगाव- सर्वसाधारण
गढी – सर्वसाधारण
धोंडराई -सर्वसाधारण (महिला)
मादळमोही – सर्वसाधारण
पाडळसिंगी -सर्वसाधारण (महिला)
पात्रूड -सर्वसाधारण महिला
दिंद्रुड -सर्वसाधारण महिला
चिखलबीड -सर्वसाधारण
नवगण राजुरी -सर्वसाधारण महिला
बहिरवाडी -सर्वसाधारण महिला
पिंपळनेर (ग.) -सर्वसाधारण
नाळवंडी -सर्वसाधारण महिला
पाली -सर्वसाधारण (महिला)
लिंबागणेश -सर्वसाधारण
येवता -सर्वसाधारण
घाटशीळपारगाव -सर्वसाधारण
रायमोहा -सर्वसाधारण
पिंपळनेर – सर्वसाधारण
पारगाव घुमरा -सर्वसाधारण
दौलावडगाव -सर्वसाधारण महिला
धामणगाव-सर्वसाधारण
धानोरा -सर्वसाधारण महिला
लोणी सय्यद मीर -सर्वसाधारण महिला
कडा – सर्वसाधारण महिला
मुर्शदपूर -सर्वसाधारण
ह.नारायण आष्टा – सर्वसाधारण महिला
विडा -सर्वसाधारण महिला
युसुफवडगाव -सर्वसाधारण
सिरसाळा -सर्वसाधारण
पठाण मांडवा -सर्वसाधारण
जोगाईवाडी -सर्वसाधारण
घाटनांदूर -सर्वसाधारण महिला
पट्टीवडगाव -सर्वसाधारण







