एका प्रभागातील मतदार दुसर्या प्रभागात
बीड (रिपोर्टर): सर्वत्र सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या प्रभाग रचना होऊन प्रभागाचे, गटाचे आरक्षणही काल घोषीत करण्यात आले. काल सायंकाळी निवडणूक आयोगाने नगरपालिका मतदार यादीवर आक्षेप घेण्याची मुदत संपलेली असताना त्यात वाढ करत 17 ऑक्टोबरपर्यंत यावर हरकती नोंद करता येणार आहेत.
प्रभाग रचनेमध्ये अनेक मतदारांची नावे या प्रभागातून त्या प्रभागात गेलेली आहेत. यावर राजकारणाचा अभ्यास असणार्या अनेक लोकांनी आक्षेप नोंदवले आहेत. मात्र या मतदारांची नावे शेकड्यात असण्याऐवजी हजारोंच्या संख्येने एका प्रभागातील मतदार दुसर्या प्रभागात गेल्याने निवडणूक आयोगाने यावर हरकती नोंदविण्यासाठी 13 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. त्यात चार दिवसाने वाढ करत हरकती नोंदविण्यासोबत काही सूचना करण्याचे आवाहनही मतदारांना केले आहे. आता या हरकती आणि सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहेत.







