
बीड (रिपोर्टर): गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे आहे. नैऋत्य मोसमी पावसाने परतीच्या पावसाचे निरोप घेतला आहे. असे असतानाही सलग तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून शेतकर्याला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात यंदा ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांची जनावरे, जमीनी या पावसात वाहून गेले आहेत. राज्यातील नैऋत्य पावसाने परतीचा निरोप घेतलेला असताना हवामान अंदाजानुसार 15 ते 18 असे चार दिवस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडू शकतो. यामुळे कृषी विभागाने शेतकर्यांनी काढलेली पिके आणि काढणीला आलेली पिके यांची सुरक्षा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







