मावि-मनसेच्या नेत्यांनी आयोगाची घेतली भेट
शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांची उपस्थिती
मुंबई (रिपोर्टर): राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकीची घोषणा होणार आहे. या निवडणुका नि:पक्ष, पारदर्शकपणे व्हाव्या यासाठी आज मावि-मनसेच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. या वेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह आदी नेत्यांची उपस्थिती होती. केंद्रिय आयोगाची देखील शिष्टमंडळ भेट घेणार आहे.
निवडणुकीच्या बाबतीत मध्यंतरी संशय व्यक्त केला जात होता. मतदार याद्यात फेरफार व इतरही घोळ असल्याचा आरोप करण्यात आलेला होता. स्थानिकच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. येत्या काही दिवसात निवडणुका जाहीर होणार असल्याने या निवडणुका नि:पक्ष आणि पारपदर्शकपणे व्हाव्यात या मागणीसाठी माविआ आणि मनसेच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. भेटीपूर्वी शिवसेनेच्या कार्यालयामध्ये या नेत्यांची बैठक झाली. या बैढकींला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, माकपचे अजित नवले, सपाचे शेख रईस, वर्षा गायकवाड, संजय राऊत यांची उपस्थिती होती. दरम्यान एक शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाची देखील भेट घेणार आहे.







