जिल्हाधिकारी कार्यालयासमोरआमरण उपोषण
बीड, (रिपोर्टर)ः- मागील आठ महिन्यापुर्वी भरती प्रक्रियेत ग्रामसेवकपदी निवड झालेली असतांनाही नियुक्ती मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.
पांढरे बळीराम जनार्धन यांची आठ महिन्यापुर्वी झालेल्या भरती प्रक्रियेत निवड झालेली आहे. निवड होवून अनेक महिने उलटले तरी त्यांना जिल्हा प्रशासनाने नियुक्ती पत्र दिले नाही. नियुक्तीपत्रासाठी पाढरे हे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.








