
बीड (रिपोर्टर)ः- पांगरी रोड परिसरात करपरा नदीच्या पुढे एका तरुणाचा रात्री मृतदेह आढळून आला आहे. सदरील या तरुणाचा मृत्यु कुठल्या कारणावरुन झाला हे मात्र समजू शकले नाही. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
किशोर अशोक क्षीरसागर वय-37 वर्षे, रा.पालवन रोड बीड या तरुणाचा करपरा नदीच्या पुढे असलेल्या रिकाम्या जागेत मृतदेह आढळून आला. सदरील मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मरणाचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.








