खासगी कर्मचार्याकडून लूट सुरुच
बीड (रिपोर्टर): माध्यमिक शिक्षण विभागामध्ये चार खासगी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. हे कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचार्यासह इतर नागरिकांची आर्थिक लूट करत आहे. याकडे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. सदरील या कर्मचार्याविरोधात जि.प.चे सीईओ यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये नुसता अनागोंदी कारभार सुरु आहे. सर्वसामान्यांना या विभागामध्ये न्याय मिळत नाही. पैसे दिल्याशिवाय पान हलत नसल्याच्या अनेक तक्रारी माध्यमिक शिक्षण विभागाच्या आहेत. या शिक्षण विभागामध्ये चव्हाण, जाधव, आरेकर, दराडे, प्रभाळे हे कर्मचारी खासगी तत्वावर नियुक्त केले. सदरील हे कर्मचारी नागरिकांची लूट करू लागले. एवढी मोठी लूट होऊनही वरिष्ठ अधिकारी या कर्मचार्यांना पाठिशी घालत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओंनी यात लक्ष घालून संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.








